नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये‍ थ्रीडी सभा

नाशिक: सध्या महाराष्‍ट्रात देखील मोठया प्रमाणात मोदी लाट आहे. त्यामुळेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेचे महाराष्ट्रात सर्वत्र आयोजन केले जात आहे. मोदी प्रत्याक्षात आले नाहीत तरी त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडावा म्हणून काही ठिकाणी त्यांच्या थ्रीडी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक येथील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची थ्रीडी सभा रविवारी नाशिकमध्ये होत आहे. या सभेची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्वच ठिकाणी मोदींची सभा होऊ शकत नाही, त्यामुळे भाजपने ही शक्कल लढवली आहे.

मोदी यांची ही सभा गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ मोकळ्या मैदानावर होणार आहे. सभेसाठी १० बाय १० आकारची होलिओग्राफिक स्क्रीन लावण्यात येणार आहे. थ्रीडी सभेची यंत्रणा उभी करण्यासाठी गुजरात, आंध्र प्रदेशातून तंत्रज्ञ येणार आहेत. जवळपास १६ फूट उंचीच्या होलिओग्राफिक स्क्रीनवर भाषण प्रक्षेपित केले जाणार आहे. या सभेसाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.