मुंबई- दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी शिवसेनेबरोबर युती करण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव होता अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्याेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा हा दावा खोटा असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्याळ दाव्याजचा स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावला आहे.
गेल्यास काही दिवसांपासून मनोहर जोशी यांची राज्यसभा किंवा लोकसभेची उमेदवारीची इच्छा शिवसेना नेतृत्वाने पूर्ण केली नाही. त्याेमुळे जोशी यांची स्मरणशक्ती कमी झालेली दिसत आहे. अशा शब्दाेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत टीका केली आहे. जोशी यांच्याू या दाव्यादमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेबरोबर यावे म्हणून १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीच्या नेत्यांनीच प्रयत्न केले होते. २००९ मध्ये नव्हे तर १९९९ मध्ये युतीकडून प्रस्ताव आला होता. जोशी यांना बहुधा ते माहित नसावे, कारण तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यात आले होते, असेही मलिक यांनी सांगितले.