
पुणे – पाणी बंद करू असे धमकावणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा अदखलपात्र आहे असे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे . या प्रकरणाचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सोपवलेला असून बारामती तालुक्यामधील वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. भादंवि १७१ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
