मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, पद्मसिंग पाटील, माज मंत्री विजयसिंह मोहिते पाटील या दिग्गज नेत्याचे वर्चस्व पणाला लागले आहे. त्यामुळे सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील १९ मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या आहेत. त्यानंतर आता गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या दुस-या टप्प़ययात राज्यातील १९ मतदारसंघांसोबतच देशभरात १३ राज्यातल्या १२१ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. त्यामध्ये अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या मतानात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.