ओळखपत्राशिवाय करता येणार मतदान

मुंबई: मतदान करण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र नसले तरीही यंदा तुम्ही मतदान करु शकणार आहात, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव असून ओळखपत्र नसलेल्या नागरिकांना दिलासा लाभला आहे. विदर्भात गुरुवारी सुरु असलेल्या मतदानावेळी ओळखपत्र नसलेल्याना मतदान करता आले आहे. त्यासाठी दुसरे कुठलेही ओळखपत्र चालेल अशी माहिती आयोगाने दिली आहे.

गुरुवारी सकाळपासूनच विदर्भातील १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जर तुमचे नाव मतदान यादीत असेल, मात्र तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तरीही घाबरण्याचे आता काही कारण नाही. मतदान करण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र नसले तरीही यंदा तुम्ही मतदान करु शकणार आहात. त्यासाठी छायचित्र असलेले दुसरे कोणतेही ओळखपत्र ग्राहय धरले जाणार आहे.

या लोकसभा निवडणूकीत चांगले मतदान व्हावे या उद़ेशाने निवडणूक आयोगाने यंदा मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ही शक्कल लढवली आहे. तुमच्याकडे अधिकृत असे कोणतंही ओळखपत्राला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार आहे.