राज ठाकरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल

यवतमाळ- यवतमाळ येथील पोलीस ठाण्यात वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत सापडले आहेत. यवतमाळ येथील सभेत त्यांनी शेतक-यांना उदेशून मरा पण नेत्यांना मारून मरा, असे वादग्रस्त विधान केले होते.

यवतमाळ येथील पोलिसांनी या विधानानंतर राज यांच्या विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ येथील सभेत राज ठाकरे यांनी वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानेच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागला आहे. आत्महत्या हा शेतक-याच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असे वादग्रस्त विधान केले होते. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधून रोज ४८ ट्रेन्स भरून येतात. या गाड्यांमधून आलेली ही माणसं कुठे जातात? पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्ये. त्यांच्या हाताला काम मिळते पण इथल्या मराठी मुलांच्या हाताला मात्र काम नाही. हा प्रश्न खासदारानं सोडवालयला हवा. असा मुद्दाही राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मांडला होता. त्याईनंतर या भाषणाची दखल मुख्यवमंत्री चव्हाण यांनी घेतली होती, त्यामुळेच राज ठाकरे यांच्या विरूद़ध गुन्हा दाखल झाला आहे.