मुंबईच्या प्रशिक्षक पदासाठी चौघांत चुरस

मुंबई- आगामी काळातील मोसमात मुंबईने दमदार पुनरागमन करावे यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आतापासनूच तयारी चालू करण्यातत आली आहे. सध्याचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना डच्चूही देण्यात आला आहे. त्यारमुळे आता त्यांची जागा कोण घेणार यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या प्रशिक्षक म्ह‍णून अजित आगरकर, फिरकीपटू साईराज बहुतुले, पारस म्हांब्रे व संदीप दहाड यांची नावे आघाडीवर आहेत.

एमसीएच्या व्यवस्थापकीय बैठक बुधवारी झाली. यामध्येक प्रशिक्षक पदाबाबत चर्चा करण्यात आली आणि १४ एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरवले. या बैठकीला माजी कसोटीपटू अजित आगरकर हजर होता. त्याने प्रशिक्षकपदासाठी रसही दाखवला. एमसीएने त्याच्या नावावर शिक्कामोर्तब न करता या पदासाठी इच्छुक असलेल्यांचे फॉर्म मागवले आहेत.

या पदासाठी इच्छूक असलेल्याची मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या पदासाठी अजित आगरकरसोबतच फिरकीपटू साईराज बहुतुले, पारस म्हांब्रे व संदीप दहाड यांनीही मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात चौघांपैकी कोण प्रशिक्षक होणार यांची उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment