मायक्रोसॉफ्ट सुरतला बनविणार पहिली स्मार्टसिटी

सूरत- मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनने भारतातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्यासाठी गुजराथेतील सुरत शहराची निवड केली आहे. त्या अंतर्गत मायक्रोसॉफ्ट क्लाऊड टेक्नॉलॉजी, मोबाईल अॅप्लिकेशन, डाटा अॅनालिटिक्स व सोशल नेटवर्क यांच्या एकत्रित प्रयोगाने नागरी सेवा उपलब्ध करून देणार आहे. त्या दृष्टीने सिस्टीम विकसित करण्याचे काम सुरू झाले असल्याचे समजते.

या संदर्भात सुरत शहर विकास उपायुक्त सी.वाय भट म्हणाले की आपत्कालीन परिस्थिीतही स्मार्ट सिटीमुळे नागरिकांना हवी ती माहिती एका क्लीकवर मिळू शकणार आहे. म्हणजे एखाद्याला अचानक डॉक्टरची गरज पडली तर मायक्रोसॉफट अॅपच्या सहाय्याने त्याला हवी ती माहिती त्वरीत मिळू शकणार आहे. मे अखेरीपर्यंत या नव्या प्रोजेक्टची सुरवात होत आहे.

विज्ञान केंद्रात आभासी जग बनविण्यासाठीही मायक्रोसॉफट सुरत नगरपालिकेची मदत करणार आहे. स्मार्ट सिटी झाल्यामुळे टाऊन प्लॅनिंग करणे सुलभ होणार आहेच पण त्यामुळे पैसा, वेळ आणि उर्जेची बचत होऊ शकणार आहे.