लंडन – भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आले तर भारताच्या अर्थिक विकासाला नककीच चालना मिळेल असे अनिवासी भारतीय अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी सांगितले. ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह २०१४ मध्ये भाषण करताना ते बोलत होते.
देसाई म्हणाले भाजप जरी अन्य पक्षांच्या सहकार्याने सत्तेवर आले तरी भाजपला अधिक जागा असतील व ही युती मजबूत असेल. मोदी ही भारताच्या विकासाचा अजेंडा पुढे नेणारी पहिलीच व्यक्ती असेल कारण विकास हेच त्यांचे प्रमूख ध्येय आहे. त्यामुळे गुंतवणुकदार आकर्षित होतील अशा योजना या सरकारकडून नक्कीच सादर केल्या जातील यात शंका नाही. २०१५ पर्यंत भारताचा विकास दर ६.५ टक्क्यांवर तर मोदींच्या कार्यकालाच्या निम्या टप्प्यावर हा विकासदर ८.५ टक्कयांवर जाईल असेही देसाई म्हणाले.