क्षणात रूप बदलणारा रणगाडा

पोलंड येथील शस्त्र निर्माण कंपनीने ब्रिटनच्या सहाय्याने युद्धभूमीतून गायब होणारा रणगाडा विकसित केला आहे. पोलंडच्या ओब्रम आणि ब्रिटनच्या बीएई या कंपन्यांनी एकत्र येऊन बनविलेल्या या रणगाड्याचे नामकरण पीएल ०१ असे करण्यात आले आहे. ३५ टन वजनाच्या या टँकमध्ये ३ लोक बसू शकतात. त्याची लांबी ७ मीटर असून उजव्या बाजूला एक गन व रिमोटवर चालणारी आणखी एक गन यात समाविष्ट आहे.

दिवस असो वा रात्र या रणगाड्यातून बाहेरच्या सर्व हालचाली व्यवस्थित न्याहाळता येतात. या टँकला बाहेरच्या बाजूने विशिष्ठ प्रकारच्या टाईल्स लावल्या गेल्या आहेत. त्यामुळे बटण दाबताच हा टँक कार मध्ये रूपांतरीत होतो. तसेच तापमान बदलले की या टँकचा रंगही बदलतो. युद्धात हिट इमेजिंग सेन्सरच्या सहाय्याने अन्य टँकचा पत्ता लावता येतो मात्र या टँकमध्ये हे सेन्सर असे अॅडजस्ट केले गेले आहेत की तापमान वाढले की हा रणगाडा कारमध्ये रूपांतरीत होतो. २०१८ साली हा रणगाडा प्रत्यक्ष युद्धभूमीत सामील होऊ शकणार आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment