मोदी म्हणजे उतावळा नवरा – शरद पवार

भंडारा(लाखणी) – भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी म्हणजे उतावळा नवरा अशी टीका राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. भंडारा मधील लाखणी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार एकाच मंचावर दिसले. नरेंद्र मोदी हे गुडघ्याला बाशींग बांधून लग्नासाठी उतावीळ असणाऱ्या नवरदेवासारखे आहेत. असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर टीकेची झोड उडवली. 

देशाचा विकास हा युपीए सरकारनेच केला आहे. यामुळे देशाच्या विकासासाठी युपीए सरकारलाच साथ द्यावी असे आवाहान शरद पवार यांनी मतदारांना केले.   भाजप, शिवसेना हे पक्ष दिखाऊगिरी करण्याचे काम करत असल्याची टीका सोनिया गांधींनी यावेळी केली. यूपीए सरकारने नुकसानग्रस्तांना मदत केली. नक्शलवाद नष्ट करण्यासाठी पावले उचलली देशातील गरीबांना पोटभोर जेवन मिळावे यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणला. अन्नसुरक्षा कायदा जगात कुठेच नाही. असे म्हणत सेनिया गांधींनी युपीए सरकराने केलेल्या कामांचा पाढा मतदांपुढे वाचला.