
भाजपने निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रचार गाण्याचा अल्बम सौगंध या नावाने मंगळवारी प्रकाशित केला असून यातील प्रचार गाणे खुद्द मोदींच्याच आवाजात असल्याचे समजते. संवाद स्वरूपी हे गाणे – मै देश नहीं मिटने दूँगा, मैं देश नही झुकने दूँगा असे असून ते प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. त्याला आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिले असून गायक सुखविदरसिंग यांनी ते गायले आहे. मात्र प्रत्येक कडव्याची सुरवात मोदींच्या आवाजात आहे. याचा व्हीडीओही जारी करण्यात आला आहे.
