थंड पेये कोणती प्याल?

भारतीय संस्कृतीमध्ये बाहेरून आलेल्या पाहुण्याला थोडा गुळाचा खडा खायला देऊन नंतर पाणी प्यायला देण्याची पद्धत होती. कारण बाहेरून घरात आल्याबरोबर एकदम ढसाढसा थंडगार पाणी प्यालो तर काही दुष्परिणाम संभवतात. आयुर्वेदामध्ये गूळ हा उष्ण मानला गेलेला आहे आणि आपण बाहेरून येतो तेव्हा शरीर उष्ण झालेले असते. म्हणूनच उष्णेन उष्णता शम्यते या नियमानुसार गूळ खायला द्यावा. याचा अर्थ असा की, बाहेरच्या कडक उन्हापेक्षा गूळ कमी उष्ण असतो. बाहेरच्या उन्हाने शरीर खूप तापलेले असते म्हणून त्यापेक्षा थोडा उष्ण असलेला गूळ खावा, मग शरीर थोडे थंड झालेले असते. त्यावर थोडे थांबून थंड पाणी प्यावे. ते थंड पाणी सुद्धा ङ्ग्रीजचे नको, माठातले असावे. आता आपण हे सारे नियम विसरून गेलो आहोत आणि कृत्रिमरित्या तयार केलेली बाजारातली थंड पेये कसलाही मागचा पुढचा विचार न करता मनसोक्तपणे प्यायला लागलो आहोत. सध्या सारी मानव जातच एका मोठ्या संकटात सापडलेली आहे. ते संकट म्हणजे पुरुषांच्या शुक्रबीजात झालेली घट.

ही समस्या निर्माण होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. पण अती शीत पेये पिणे हे सुद्धा एक कारण आहे. पूर्वी उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत, पन्हे आदी थंड पेये पीत असत. पण आता बाजारातली सगळी कृत्रिम थंड पेये उन्हाळा असो की नसो प्राशन केली जायला लागली आहेत. तेव्हा थंड पेयांची निवड कशी करावी, याबाबतीत काही सूचना देण्याची गरज निर्माण झालेली आहे. एका तज्ज्ञ डॉक्टरने तर माठातले थंड पाणी हे सर्वात छान आणि बिनधोक असे थंड पेय आहे, असे म्हटलेले आहे. शुद्ध, स्वच्छ पाणी प्राशन केल्याने अन्य थंड पेये पिण्याइतकाच लाभ होतो. परंतु पाण्यात काही तरी टाकून पिण्याची हौसच असेल तर सेंद्रीय पदार्थ टाकलेली थंड पेये प्यावे. त्या पेयांमध्ये मिनरल्स् आणि इलेक्ट्रोलाईटस् असावेत. उष्मांक कमी असावेत आणि कसल्याही प्रकारची प्रिझर्व्हेटीव्हज् अजिबात नसावीत. अशा प्रकारची थंड पेये पिण्यास काही हरकत नाही. 

पाणी जेवताना प्यावे की जेवल्यानंतर प्यावे हा एक प्रश्‍न असतोच. शास्त्र असे सांगते की, जेवताना अधूनमधून भरपूर पाणी पिऊ नये. शक्यतो जेवणाच्या एक तास आधी आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे. जेवताना पाणी पिणे आवश्यकच वाटत असेल तर अगदी घोटभर पाणी आणि तेही हळू हळू प्यावे. जेवताना ढसाढसा पाणी पिले की, नुसत्या पाण्यानेच पोट भरते आणि पोटात अन्न जात नाही. मग थोड्या वेळाने लगेच भूक लागल्यागत होते आणि जेवणाचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळते. त्याचा आपल्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतो. चहा प्यायचाच असेल तर थोडा प्यावा आणि शक्यतो ग्रीन टी वापरावा. ग्रीन टी किंवा ङ्गळांचे रस प्राशन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment