बिल क्लिंटन यांचा जुना लॅपटॉप लिलावात

वॉशिग्टन -अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा १५ वर्षांपूर्वीचा जुना लॅपटॉप लिलावात विकण्यात येत असून त्याला ६० लाख रूपये किंमत मिळेल असे लिलावकर्ते आर.आर. ऑक्शनचे बॉबी लिविंगस्टोन यांनी सांगितले. ही लिलाव कंपनी दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंच्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे.

बिल क्लिंटन जेव्हा प्रथम अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी याच लॅपटॉपवरून पहिले सरकारी ईमेल पाठविले होते. नोव्हेंबर १९९८ मध्ये स्पेस शटल अॅस्ट्रोनॉट जॉन ग्लेन याला याच लॅपटॉपमधून पाठविलेले इमेल अजूनही या लॅपटॉपच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये आहे. ग्लेन याने नासाच्या एसटीएस ९५ मिशन मध्ये स्पेस स्टेशनवरून किलंटनना ईमेल केले होते त्याचे उत्तर क्लिंटन यांनी पाठविले होते.

लिलावकर्ते बॉबी यांच्या मताने हा लॅपटॉप अनोखाच आहे. तोशिबा कंपनीच्या या लॅपटॉपला एक्स्टर्नल हार्ड डिस्क, फ्लॅापी डिस्क आणि पॉवर कॉर्डसही आहेत.

Leave a Comment