
पुणे – विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी व खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी अंध व अपंग विकास संस्थेच्या वतीने रंगपंचमीचा सण रद्द करुन गारपीटग्रस्तांना मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश अप्पर जिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
