ठाणे: लैंगिंक संबंधास नकार देणार्या 30 वर्षीय विवाहितेला मजूर ठेकेदाराने जिवंत जाळल्याची घटना ठाणे जिल्ह्यात वाडा येथील अभितघर या आदिवासी पाड्यात घडली. या घटनेत त्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या महिलेचा पती जे एस स्टील या कंपनीत मजूरीचे काम करतो. आरोपी लखन यादव हा या कंपनीला मजूर पुरवणारा ठेकेदार आहे.
शुक्रवारी रात्री यादव हा अभितघर येथील महिलेच्या घरी आला व त्याने या महिलेशी शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केला, तिने या प्रकाराला विरोध करताच यादव याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले तसेच बळजबरीने तिला रॉकेल पिण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने या महिलेला पेटवून दिले. मोठ्या प्रमाणावर भाजलेल्या या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाल्याचे पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे.