शरद पवार यांची शिवसेनेवर टीका

बीड- न्यायालयाने ज्यांना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले, त्यांना शिवसेनेने तिकीट दिले असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. शिर्डी मधील शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीवरून भाजप-सेनेवर टीका केली आहे. या सभेत त्यांनी बीड मधील भाजपचे उमेदवार गोपिनाथ मुंडे यांच्याीवर टीका केली आहे.

गेवराई ये‍थे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला, पवार यांनी यावेळी शिर्डीचे सेना उमेदवार घोलप यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल सेना नेतृत्वावर टीका केली. शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांत गुंडप्रवतीच्या लोकांनाच उमेदवारी दिली जात असल्याचे त्यानी म्ह टले आहे.

त्या सोबतच त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीस गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे जबाबदार आहेत. त्यांनी गुजरातमधील जनतेची माफी मागितली पाहिजे असे मत यावेळी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.