नागपूर – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी आज विदर्भात पहिल्याच टप़्पयात मतदान होणार आहे. त्याठिकाणी १० एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शनिवारी विदर्भातील प्रमुख उमेदवारा आज अर्ज भरणार आहे. त्यामुळे याठिकाणी अर्ज भरण्यािसाठी आज गर्दी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहा मतदार संघांचा समावेश आहे.
विदर्भातील सर्वच प्रमुख पक्षाचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नागपूरातून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे शनिवारीच त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख उमेदवार प्रफुल्ल पटेल हे देखील आजच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यवतमाळमधून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यािमुळे ते देखील आज अर्ज भरणार आहेत.
पहिल्याच टप्प़यात मतदान होत असलेल्या व या मतदारसंघात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली-चिमूर या मतदारसंघाचा समावेश आहे. याठिकाणी आता अर्जांची छाननी सोमवारी २४ मार्च रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख बुधवार २६ मार्च ही आहे. तर याठिकाणी गुरुवारी १० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.