लालकृष्ण अडवाणींची शिवसेनेकडून पाठराखण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराजी नाटय रंगले आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वजभूमीवर मोदीयुगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुने जाणते नेते लालकृष्ण अडवाणींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आहे. अडगळीत फेकल्या गेलेल्या अडवाणी यांची शिवसेनेने पाठराखण केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अडवाणी भोपाळसाठी आग्रही असताना त्यांच्या माथी गांधीनगरची जागा मारण्यात आली आहे. त्य़ामुळे पक्षातील अडवाणींची सद्दी संपल्याची चर्चा आहे. मात्र जनतेचे अडवाणींशी नाते तुटलेले नाही. तसेच अडवाणी यांची गोष्ट छोटी असली तरीही दुर्घटना मोठी घडू शकते असा सूचक इशारा, ‘सामना’तून भाजपला आणि पर्यायाने मोदींना देण्यात आला आहे. भाजपात मोदीयुगाची सुरुवात झाली असली तरीही अडवाणी युगाचा अस्त झालेला नाही, अशा शब्दात अडवाणींची पाठीशी शिवसेना उभी राहाताना दिसत आहे. शिवसेनेने अडवणी यांची बाजू घेतल्याने त्यांनही थोडेसे हायसे वाटत असेल.

“अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत यायला हरकत नव्हती, पण तसे झाले नाही. ज्यांनी पक्ष उभा केला व आजचे वैभवाचे दिवस दाखवले त्या आडवाणींना अखेरपर्यंत लोंबकळत ठेवले गेले आणि शेवटी आडवाणी यांनी ‘गांधीनगर’मधून लढायचे नाही तर ‘भोपाळ’मधूनच लढायचे ठरविल्याणनंतर मात्र सर्वांची धावपळ झाली. भाजपमध्ये मोदीयुग सुरू झाले आहे, पण देशाच्या राजकारणात आडवाणीयुगाचा अस्त झालेला नाही”, असा इशाराही शिवसेनेने यावेळी त्यांनचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून दिला आहे.

Leave a Comment