
अॅपलने त्यांचे आयपॅड टू टॅब्लेट आयपॅड फोरशी रिप्लेस करून देण्यात येणार असल्याचे व त्यासाठी वेगळी किंमत आकारली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. आयपॅड फोरला ९.७ इंचाचा रेटिना डिस्प्ले असून १६ जीबी वायफायची किमत ३९९ डॉलर्स तर १६ जीबी वायफाय प्लस सेल्यूलर मॉडेलची किंमत ५२९ डॉलर्स इतकी आहे. सर्व प्रमुख अमेरिकन विक्रेत्यांकडे ही रिप्लेसमेंट होऊ शकणार आहे.
