मतदान करा- मोबाईल खरेदीवर १० टक्के सूट मिळवा

जालंदर- आगामी निवडणुकात युवा वर्गाने आवर्जून मतदान करावे यासाठी जालंदरचे निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी वरूण रूजम यांनी प्रथम मतदान करणार्‍या मतदारांना मोबाईल खरेदीवर १० टक्के सूट दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या अन्य सहकारी अधिकार्‍यासोबत घेतलेल्या बैठकीत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला असून त्याच्या अम्मलबजावणीसाठी शहरातील कांही प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकानदारांशी सहकार्याचे आवाहन केले आहे. या दुकानदारांनीही त्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे.

यासाठी मतदान केल्याची खूण म्हणून बोटाला लावलेली शाई मतदाराला दुकानदारास दाखवावी लागणार आहे. कांही दुकानदारांनी या पुढे जाऊन मतदार यादीत नोंद केल्याची रिसीट दाखविली तरी मोबाईल खरेदीवर १० टक्के तर मोबाईल अॅक्सेसरीजवर १५ टक्के सूट देण्यात येईल असे जाहीर केले आहे. प्रथम मतदान करणारे मतदार मतदानास प्रेरित व्हावेत यासाठी रेस्टॉरंट चालकांनी यापूर्वीच ३० एप्रिल रोजी मतदान केल्याचा पुरावा दिल्यानंतर रेस्टॉरंटच्या बिलात २० टकके सूट दिली जाईल असे जाहीर केले आहे.

Leave a Comment