गडकरीच्या विरोधात सेनेचा गेमप्लॅन

नागपूर: काही दिवसांपूवी भाजपनेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधली होती. त्या‍वेळेसपासून शिवसेना नाराज आहे. त्यामुळे त्यांनी आता नितीन गडकरी यांच्याा विरोधाताच गेम प्लॅन आखला आहे. नागपूरचे माजी उपमहापौर आणि शिवसेना नेते शेखर सावरबांधे यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्नप सुरू असल्याेचे समजते. त्याकमुळे आता आगामी काळातील निवडणूक गडकरींना जड जाणार असे वाटते.

आगामी काळात केल्या जात असलेल्या शिवसेनेच्या या गेम प्लॅनमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा दुराव्याला सुरुवात होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसेना दुखावली होती. त्याचेच उट्टे काढण्यासाठी शिवसेना गेल्या काही दिवसांपासून गडकरी यांच्याय विरोधाता उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत आहे.

नागपुरात तेली समाज हा भाजपचा परंपरागत मतदार आहे आणि सावरबांधे हे तेली समाजाचे आहेत. त्यामुळे सावरबांधे यांनी निवडणूक लढल्यास गडकरींना फटका बसेल असे गणित शिवसेनेचे असल्याची चर्चा आहे. त्याणमुळेच त्या ना मैदानात उतरविण्यािचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू असल्याेचे समजते.