सेहवागकडून बरेच शिकायला मिळाले- अॅतरोन फिंच

मीरपूर – आयपीएल सामन्यााच्या दरम्यान दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघात सेहवागसमवेत चार वर्षे सलामीला फलंदाजी केल्याने डेव्हिड वॉर्नरचा खेळ सर्वार्थाने बहरल्याचे त्याचा सलामीचा जोडीदार अॅ रोन फिंच याने म्हटले आहे. त्यां च्यानकडून मला खूप काही शिकायला मिळाले असल्यारचे तो यावेळी बोलताना म्हाणाला.

वॉर्नरच नव्हे तर मलादेखील सेहवागकडून बरेच काही शिकायला मिळाले. सेहवागने मला सर्वप्रथम काय शिकवले असे म्हणाल, तर कोणताही चेंडू असा मारा की तो जास्तीत जास्त लांब जाईल, हीच त्याची पहिली शिकवण होती. भारतीय उपखंडात खेळताना चेंडू जेव्हा नवीन असतो, क्षेत्ररक्षणाच्या बंधनांचा फायदा घेऊन धावा झटपट काढून घ्याव्या, हा त्याचा संदेश खूपच उपयुक्त ठरला आहे.

वॉर्नर अनेक प्रतिभा लाभलेला खेळाडू आहे. त्याच्याशी मी स्वत:ची कधीच तुलना करत नाही. आम्ही दोघेही आक्रमक फलंदाज असल्याने कुणावरही दबाव न येण्याची खबरदारी आपोआपच घेतली जात असल्याचेही फिंचने म्हटले आहे.

Leave a Comment