अण्णा हजारे यांचे उध्दव ठाकरेना पत्र

पारनेर : र्शिडी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनी आमदार बबन घोलप यांच्यासारख्या गुन्हेगारी व भ्रष्टाचाराची प्रकरणे न्यायप्रविष्ठ असणा-या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण़्षणा हजारे काहीसे नाराज आहेत. त्या‍मुळेच अण्णा हजारे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून आमदार घोलप यांना पत्र लिहून खेद व्यक्त केला आहे.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी शिर्डीतून शिवसेनेने आमदार बबन घोलप यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून युती सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी चांगलाच हादरा दिला होता. तर घोलप यांच्याच प्रकरणात अण्णांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. या पार्श्वयभूमीवर अण्णांनी रविवारीच घोलप यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.

त्यांनतर आता अण्णांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून समाचार घेतला. पक्षाचा व्याप सांभाळताना काही गोष्टी लक्षात येत नसतील म्हणून निदर्शनास आणून देत असल्याचा टोला लगावत पक्ष प्रमुखांनी उमेदवार निवडताना त्याचे चारित्र्य,पूर्व इतिहास यांची माहिती घेणे महत्वाचे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही, असे अण्णांनी नमूद केले.
घोलप यांच्यावर गैरव्यवहारप्रकरणी आरोप आहेत व ते न्यायप्रविष्ट आहेत, असे असताना घोलप यांना उमेदवारी देणे हे खेदजनक आहे असे म्हिटले आहे.

Leave a Comment