राहुल नार्वेकर घेणार शरद पवार यांची भेट

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील नाराजी उघड झाली असून निवडणूकीच्या पूर्वी अनेकांनी पक्ष सोडण्यााची तयारी चालवली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेऊन उमेदवारी अर्ज मागे घेणारे शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर हे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. गेल्याँ काही दिवसांपासून नार्वेकर हे शिवसेना नेतृत्वावर नाराज असून ते आगामी काळात राष्‍ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याकची चर्चा आहे. त्याीमुळे आता शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

विधानपरिषेदच्या निवडणूकीसाठी ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात होता. शिवसेनेतर्फे डॉ. नीलम गो-हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि निवडणूक बिनविरोध पार पडली. विशेष म्हणजे नार्वेकर अर्ज मागे घेणार असल्याची माहिती शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनाही नव्हती असे उघड झाले होत

या निवडणूकीतून शिवसेनेच्या नार्वेकर यांनी कोणाच्या सांगण्यावरुन अर्ज मागे घेतला यावर तर्कवितर्क लढवले जात होते. त्या्मुळेच आता चर्चा करण्यायसाठी नार्वेकर हे रविवारी शरद पवारांना भेटणार आहेत. त्या्मुळे आगामी काळात त्यांरचा राष्ट्रावादी कॉंग्रेसमधील प्रवेश निश्चीतत मानला जात आहे.