प्रख्यात गीतकार सुधीर मोघे यांचे निधन

पुणे,  –  फिटे अंधाराचे जाळे…सांज ये गोकुळी…एकाच या जन्मी जणू…रंगूनी रंगात सार्‍या…अशी एकापेक्षा एक सरस गीते आपल्या प्रतिभासंपन्न लेखणीतून साकारणारे प्रख्यात कवी, संगीतकार व गीतकार सुधीर मोघे यांचे आज (15 मार्च) प्रदीर्घ आजाराने  निधन झाले.  ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी प्रा.शुभदा मोघे व भाऊ श्रीकांत मोघे असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजमुळे अर्धांगवायूचाही झटका आला होता. त्यांचावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी अडीच वाजण्याच्या त्यांची प्राणज्योत मालवली.

चित्रपट गीत लेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार अशा अनेक प्रांतात आपला ठसा उमटवला मात्र, त्यांचा मूळ पिंड कवीचा होता. पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केले. शांता शेळके, श्रीधर फडके, सुधीर फडके यांच्या सोबतची त्यांची गाणी विशेष गाजली.

परिचय सुधीर मोघे यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1939ला सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी झाला. त्यांचे बालपण  तेेथेच गेले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुणे शहरात घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कविता लेखनास सुरूवात केली. 1972मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले. तेव्हा ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या ‘आपली ओळख’ या कार्यक्रमातून निवेदनास सुरूवात केली. आपल्या निवेदन शैलीतून त्यांनी निवेदनाचा मापदंड उभा केला. दरम्यान त्यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ व ‘स्मरणयात्रा’ हे दोन कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येक वर्षी किमान एक चित्रपट करावा अशी त्यांची अपेक्षा होती.

अखेरचे प्रकल्पअखेरच्या काळात सुधीर मोघे यांनी भावसंगीताचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले होते. तसेच ‘सती’ नाटकावर आधारीत ‘विमुक्ता’ हा चित्रपट सुरू करण्याच्या तयारीत होते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि रवी मंकणी अभिनेते असलेल्या ‘रमा-माधव’ या आगामी चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहीली असून काही प्रसंगांसाठी संवाद लेखन केले आहे.  

पुरस्कारसाहित्य संगीत क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. चारवेळा राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, मराठी कामगार साहित्य परिषदेचा गदिमा परस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके पुरस्कार, दांडेकर कुटुंबियांचा गो.नि.दांडेकर स्मृती पुरस्कार, सोमण परिवाराचा स्वरशब्दप्रभू अजित सोमण पुरस्कार असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते.  छायाचित्र- सुधीर मोघे यांच्या नावाने आहे.
————————
प्रकाशित साहित्यकाव्यसंग्रहपक्ष्यांचे ठसे, स्वतंत्रते भगवती, लय, शब्दधून, गाण्यांची वही, आत्मरंग आदी.
———-
गद्य-निरंकशाची रोजनिशी (ललीत लेखनसंग्रह),  गाणारी वाट…(गीतसंगीताच्या वाटचालीचा मागोवा), अनुबंध…(कुसुमाग्रज, गदिमा, पु.ल आदींच्या व्यक्तीत्वाचा वेध).—————-लोकप्रिय भावगीते-सखी मंद झाल्या तारका…, दिसलीस तूं फुलले ऋतू…, मन लोभस मनमोहने, फिटे अंधाराचे जाळे, सजणा पुन्हा स्मरशिल ना…, कुण्या देशीचे पांखरू माझ्या अंगणात आले…, एकाच या जन्मी जणू…, दयाघना…, दिस येतील दिस जातील…..
———–
चित्रपट गीतलेखन-हा खेळ सावल्यांचा, जानकी, एक डाव भुताचा, शापित, पुढंच पाऊल, आत्मविश्‍वास, कळत-नकळत, चौकट राजा, सूर्योदय, लपंडाव, राजू व सुत्रधार या हिंदी चित्रपटाचे गीत लेखन
————-
संगीत दिग्दर्शन-कशासाठी प्रेमासाठी (चित्रपट), स्वामी, अधांतरी, नाजुका आदी मालिकांना गीत व संगीत, हसरते, डॉलर बहू, शरारते या हिंदी मालिकांना संगीत तसेच सनर्थ छंद व समर्थ धून या रामदासांच्या भावकवितांना संगीत आदी. याबरोबरच कवी सुरेशभट, ग्रेस, ना.धो.महानोर, रॉय किणीकर, इंदिरा संत, कुसूमाग्रज यांच्या काव्यांना स्वररचना व जिगर मुरादाबादी, दाग यांच्या गजलांना चालीही सुधीर मोघेंनी दिल्या होत्या.
—————
विशेष (निर्मिती, संकलन, संगीत दिग्दर्शन,संहिता)-नक्षत्रांचे देणे (दृक श्राव्य कार्यक्रम)- माडगुळ्यांचे गदिमा-उत्तुंग- गदिमा- मी विश्‍वाचा आहे- उत्तररात्र- मंतरलेल्या चौत्रबनात( गदिमांच्या गितांवर आधारीत)- स्मरणयात्रा (मराठी चित्रपट संगीताच्या वाटचालीचा वेध)
———-
गद्य-निरंकशाची रोजनिशी (ललीत लेखनसंग्रह),  गाणारी वाट…(गीतसंगीताच्या वाटचालीचा मागोवा), अनुबंध…(कुसुमाग्रज, गदिमा, पु.ल आदींच्या व्यक्तीत्वाचा वेध).
—————-
लोकप्रिय भावगीते-सखी मंद झाल्या तारका…, दिसलीस तूं मुलले ऋतू…, मन लोभस मनमोहने, मिटे अंधाराचे जाळे, सजणा पुन्हा स्मरशिल ना…, कुण्या देशीचे पांखरू माझ्या अंगणात आले…, एकाच या जन्मी जणू…, दयाघना…, दिस येतील दिस जातील…..