मुंबई : राष्ट्रवादीच्या बहुचर्चित लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नवनीत राणा या गेल्यात काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत राहत आहेत. त्यांना राष्ट्र्वादीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्या पासून त्याह कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादात अडकत आहेत. न्यायालयाच्या आदेशान्वीये त्यांच्यााविरूद्ध मुलुंड पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी, नवनीत आणि त्यांचे वडील हरभजन कुण्डलेस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत वंजारी यांनी याप्रकऱणी मुलुंड न्यायालयात तक्रार दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने आदेश दिल्याीनंतर मुलुंड पोलीसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
जी शाळा अस्तितवात नाही अशा शाळेचे बनावट दाखले दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे मोची या जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा त्याय दोघांवर आरोप आहे. यामुळे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत नवनीत राणा यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.