महाराष्ट्रातील शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार

मुंबई: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतक-याना मदत देण्यासंबंधी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्यामुळे आगामी काळात नुकसानग्रस्तं शेतक-यांना लवकरच मदत मिळेल असे वाटते.
राज्यावत होत असलेल्याे अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्यांीना मदत देण्यातसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ मंत्र्यांची विशेष बैठक झाली. त्यामध्ये सध्याच्या निकषांपेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला. झालेले नुकसान पाहता, नेहमीच्या नुकसानाऐवजी हेक्टरी २५ हजार ते ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

गुरुवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये गारपीट झाली. मालेगाव आणि उमरणा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. तर बीड जिल्ह्यातल्या मौजवाडीमध्ये वीज पडून एका तरुण शेतक-याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे अर्धवट पंचनामे आणि अपूर्ण नोंदी ही सरकारी कर्मचा-याची हालगर्जी उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात उघड झाली. गारपिट आणि अवकळी पावसाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातल्या काही सदस्यांनी धुळे जिल्ह्याचा दौरा केला.

Leave a Comment