बहेनजीपेक्षा भाई बरे : केजरीवाल

मुंबई – पंतप्रधानपदासाठी नरेंद्रभाई मोदी आणि बहेनजी मायावती या दोघांतच चुरस निर्माण झाली तर आपण शेवटच्या क्षणी आपले वजन नरेंद्रभाई यांच्या पारड्यातच टाकू असे धक्कादायक विधान आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत बोलताना केले. केजरीवाल यांनी काल गुंतवणूकदारांशी आणि शेअर दलालांशी चर्चा केली तेव्हा ते बोलते होते. 

अंबुजा सिमेंटचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंघवी यांनी त्यांना नेमकेपणाने टोकदार प्रश्‍न विचारला तेव्हा, आपल्या डोक्याला बंदुकच लावली जाईल तेव्हा आपण मोदींची निवड करू असे केजरीवाल म्हणाले. या प्रश्‍नावर सुरुवातीला उत्तर द्यायला टाळाटाळ केली पण उत्तरासाठी सिंघवी अडूनच बसले तेव्हा आपण मोदींची निवड करू असे केजरीवाल म्हणाले. 

या बैठकीत मोदींनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली आणि ती प्रश्‍न विचारणार्‍यांना समाधानकारक वाटली. मात्र काही प्रश्‍नांवर ते गुंतवणूकदारांचे म्हणावे तसे समाधान करू शकले नाहीत. लोकसभा निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून त्यांची ही मुलाखत झाली होती.