शिवसेनेचे भाजप, गडकरीवर टीकास्त्र

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील झालेली जवळकीतेमुळे शिवसेना नेते चलबिचल आहेत. त्याामुळेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मनसेआणि भाजपवर टीका करण्यालची एकही संधी सोडत नाही. गुरुवारच्या् ‘सामना’च्या अग्रलेखात शिवसेनेने भाजप, मनसे आणि गडकरींवर सडकून टीका केली आहे.

आठ दिवसापूर्वीच उद्धव ठाकरेंना विश्वासात न घेता गडकरींनी राज ठाकरेंच्या भेटीचा घाट घातला. यामुळे रागाला आलेल्याश शिवसेनेने मित्रांना खड्यासारखे बाजूला कराल तर जनतेच्या मनातील अविश्वासाचा धोंडा डोक्यात पडले, असा धमकीवजा इशारा भाजपला दिला आहे. त्यामुळे अजून तरी शिवसेनेचा राग शांत झालेला दिसत नाही.

याशिवाय शिवसेनेने नितीन गडकरींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. संधीसाधूंची साथ चालणार का अशा शब्दात अग्रलेखातून मनसेवर शरसंधान साधलं आहे.“राजकारणात तसे कुणीच साधुसंत राहिलेले नाही. सगळेच संधीसाधू आहेत. ‘भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे आमच्या संतांनी भलेही म्हटले असेल, पण आताचे संधीसाधू लंगोटीएवढ्या सत्तेसाठी दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी स्वत:च्याच डोक्यात काठी मारून आपल्याच कपाळावर टेंगुळे आणीत आहेत.

आमचे जुनेजाणते मित्रवर्य व महाराष्ट्रातील आमचे राजकीय ‘साथी’ भाजपच्या नशिबी अशी टेंगुळे आली आहेत काय ? व अशा टेंगुळांना जबाबदार कोण आहे?” अशी विचारणा शिवसेनेने सामनातून केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा महायुतीतील पेच सुटण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.