पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, ४ ठार

सातारा – पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या एका अपघातात चारजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी गाडी यांच्यात विचत्र अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सुमो गाडी बंगळुरू-पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचे कारण आणि अपघातातील मृतांची नावे अद्याप कळलेली नाहीत. दरम्यान, जखमी प्रवाशांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.