बीडमध्ये मुंडेंविरोधात राष्ट्रवादीकडून सुरेश धस

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार गोपीनाथ मुंडें यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज (सोमवार) मुंबईत धस यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. धस हे सध्या आमदार तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. धस यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बीडमधून आता मुंडे, धस आणि आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार अभिनेते नंदू माधव यांच्यात लढत रंगणार आहे.

शिवसेनेकडून कोल्हापुरात संजय मंडलिक रिंगणात, तर शिर्डीत आ. घोलप मैदानात
लोकसभेसाठी शिवसेनेनं कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना, तर शिर्डीतून आमदार बबनराव घोलप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने पहिल्या यादीत १५ शिलेदारांची नाव जाहीर केली होती. त्यानंतर सेनेनं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. बबनराव घोलप हे देवळाली कॅम्प मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल आहेत. युती सरकारच्या काळात ते समाजकल्याण मंत्रीही होते. तर संजय मंडलिक हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पूत्र आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक लोकसभेच्या रिंगणात आहेत. आता त्यांच्यासमोर पूर्वीचे शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि सध्याचे कट्टर विरोधक असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय याचं असेल.

Leave a Comment