
मुंबई – काळ्या पैशांवर अंकुश आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या उपाययोजनात आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. रिझर्व्ह बँकेने प्रत्येक खातेदारासाठी एकच युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड ठरविण्याचे आदेश बँकांना जारी केले आहेत. यामुळे ग्राहकाने कितीही बँकातून खाती उघडली तरी एकाच आयडेंटिफिकेशन नंबरवर त्यांची नोंद होऊ शकणार आहे. अर्थात त्यासाठी ग्राहकाकडून बँकेला एक फॉर्म भरून घ्यावा लागेल व त्यात ग्राहकाच्या सर्व खात्यांची माहिती द्यावी लागेल.
