व्हॉटस अॅपवर आणखी दोन फिचर्स

व्हॉटस अॅपची फेसबुकने १९ अब्ज डॉलर्सना खरेदी केल्यानंतर कांही तासातच व्हॉटस अॅपने युजरसाठी आणखी दोन फिचर्स उपलब्ध करून दिली आहेत. प्रायव्हसी फिचर्स असे त्यांचे नामकरण केले गेले आहे. त्यातील एकामुळे तुम्ही शेवटी व्हॉटस्रअॅप कधी पाहिले हे तुमच्या मित्रांना कळू शकणार आहे. दुसर्‍या फिचरमुळे तुम्हाला तुमचे प्रोफाईल अथवा खास स्टेटस खास दोस्तांपासून लपवायचे असेल तर ते शक्य होणार आहे. विशेष म्हणजे आता आयफोन बरोबरच अॅड्राईड सिस्टीम असलेल्या कोणत्याही मोबाईलसाठी ही फिचर्स उपलब्ध झाली आहेत.

फेसबुकने खरेदी व्यवहार केल्यानंतर कांही तासातच व्हाटस अॅपची युजर संख्या इतकी वाढली की त्यामुळे त्यांचा सर्व्हर बंद पडला.परिणामी तीन तास ही सेवा विस्कळीत झाली होती. मात्र तातडीची उपाययोजना करून ही सेवा आता पूर्ववत सुरू केली गेली आहे. युजरच्या झालेल्या गैरसोयीबद्दल व्हॉटस अॅपने ट्वीटरवर खेद व्यकत केला आहे.

Leave a Comment