पुणे: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. पण दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध अजूनही लागलेला नाही. पोलिसांच्या हाती फक्त अवैध शस्त्रास्त्राप्रकरणी नागोरी टोळीचे दोघे जण अटकेत आहेत. मात्र त्यांच्या कडूनही ठोस असे पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे सहा महिने उलटले तरीही मारेकरी अजूनही मोकाटाच असल्याचे समजते.
या संदर्भात पोलिसांनी २० जानेवारीला मनिष नागोरी आणि विकास खंडेलवालला यांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये चौकशीही सुरू आहे. पण त्यातून ठोस असे काहीच समोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीचा गेल्याव सहा महिन्यापासून कसून शोध घेतला जात आहे.
दरम्यान , डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण होत असल्याोने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यायत आले आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यात गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वारकरी संघटनेकडून ओंकारेश्वर पुलावर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.