शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात- अजित पवार

पुणे- आागमी काळात शिवसेनेतील अनेक खासदार शिवसेना सोडत आहेत. गेल्याई काही दिवसांपासून शिवसेना हा पक्ष कमकुवत होत चालला आहे. त्यास पक्षतील काही खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्याामुळे आनंद परांजपे यांच्या नंतर राष्ट्रटवादीच्याी गळाला आणखी काही खासदार लागली असल्यातची चर्चा जोरात सुरू आहे.

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून दिवसोदिवस शिवसेनेची वाईट अवस्था होत चालली आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडूण आलेले मराठवाडा व उत्तर भागातील खासदार हे पक्ष सोडून अन्य पक्षाकडे जात आहेत. काही खासदार राष्ट्रवादी पक्षाशी संपर्क साधत असून लवकरच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याेचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.’

आागमी काळात लोकसभा निवडणूका होत असल्याने आता अठवडाभरात आचारसंहिता लागु होण्याची शक्याता आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प जूनमध्ये सादर करण्यात येणार असून त्यात किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी २० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी जाहीर केले.

Leave a Comment