धोनीच्या क्षमतेवर सर्वस्तारातून टीकास्त्र

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून परदेशात मालिका जिंकण्यात अपयशी ठरलेला महेंद्रसिंह धोनीवर सर्वस्तारांतून टीका केली जात आहे. धोनी कडून केवळ बचावात्मक धोरण अवलंबत असल्यामुळे टीम इंडियाला मालिका पराभवाचा फटका बसला आहे. आगामी काळात टीम इंडियाचे नेतृत्व त्याच्या कडून काढून नवीन खेळाडूला देण्यात यावे असे मत माजी कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ, माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या न्यूझिलंडमधील वन-डे मालिका टीम इंडियाने ४-0 ने गमावली तर त्या्नंतर कसेाटी मालिका १-0 ने गमवली. त्याामुळे टीम इंडियाचा कर्णधार धोनी याच्यानवरील दबाब वाढत आहे. धोनी हा भारतात तर चांगली कामगिरी करतो पण भारताबाहेर जिंकायचे सोडा सामना अनिर्णित राखण्यातही त्याला अपयश येत असल्याचे अमरनाथचे मत आहे. मोहिंदर पुढे म्हणाला, ‘धोनी बचावात्मक कर्णधार असल्याने प्रतिस्पर्धी संघाला वरचढ होण्याची संधी देतो. अनेक भारतीय कर्णधारांप्रमाणे धोनीचा रेकॉर्ड केवळ देशातील खेळपट्टय़ांवर चांगला आहे. विदेशात चांगली कामगिरी करण्यासाठी मन्सूर अली खान यांच्यासारखा आक्रमकपणा हवा.’ मोहिंदर यांनी भारतीय संघाचा कोच एखादा भारतीय असावा, अशी मागणी करीत डंकन फ्लेचर यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावले. कोच आणि सहायक स्टाफ काहीही करीत नसताना आणि खेळाडूंची ओरड असताना देखील त्यांना का हटविले जात नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

माजी कर्णधार राहुल द्रविडने धोनीचे कर्णधारपद त्वरित काढून घेण्यास विरोध दर्शविला. त्याच्याकडे एकवर्षी आणखी कर्णधारपद ठेवा पण विदेशात विजय मिळविण्यासाठी धोनीने जोखीम पत्करण्याची गरज असल्याचे सांगितले. राहुल पुढे म्हणाला, ‘विदेशात जिंकायचे झाल्यास किती जोखीम पत्करायची याची जाणीव धोनीला व्हायला हवी. मोक्याच्या क्षणी धोनीचे नेतृत्व बचावात्मक ठरते.’

Leave a Comment