सातारा- साता-याचे पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना एका बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी येथे घडलेल्याा बलात्कार प्रकरणात पालकमंत्री शिंदे यांया भावाचे नाव पुढे आले होते. त्यामुळे पोलिसांनी या बलात्कार प्रकरणी ह्रषिकांत शिंदे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सातारा येथील आदर्श विश्व या बिल्डिंगमध्ये रविवारी ही घटना घडली होती. या प्रकरणातील पीडितेने सातारा येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची संपूर्ण चौकशी करून या घटनेनंतर काही वेळाताच पोलिसांनी पालकमंत्र्यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना अटक केली.
बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आणखी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी आणखी काही जणंचा समावेश होता की काय यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाणार आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.