टीम इंडियाच्या विजयाची आशा मावळली

वेलिंग्टन- चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकलम यांने दमदार फलंदाजी करीत न्यूझीलंडला पराभवापासूनच वाचवले नाही तर, सामनाही न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला आहे. सोमवारी दिवसअखेर न्यूझीलंडच्या सहा बाद ५७१ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडकडे ३२५ धावांची आघाडी आहे. उद्या सामन्याचा अखरेचा दिवस असून, टीम इंडियाच्या विजयाची आशा आता मावळली आहे.

टीम इंडियाला मंगळवारी आता हा सामना वाचवण्यासाठी खेळावे लागणार आहे. कर्णधार मॅकलम (२८१) धावांवर नाबाद असून, नीशॅमला त्याला (६७) धावांवर साथ देत आहे. टीम इंडियाला सामवारी दिवसभरात वॉटलिंगच्या रुपात फक्त एक बळी मिळवता आला. मोहोम्मद शामीने त्याला १२४ धावांवर पायचीत पकडले. दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाकडे २४६ धावांची आघाडी होती. रविवारी सामन्याचा तिस-या दिवशी न्यूझीलंडचा निम्मा संघ शंभरीच्या आत तंबूत परतला होता त्याधमुळे टीम इंडिया हा सामना डावाने जिंकेल असे वाटत होते. मात्र गोलंदाजांच्या दिशाहीन गोलंदाजीमुळे दुस-या कसोटी सामन्यावरील टीम इंडियाची पकड निसटली आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकलम यांने दोन दिवस खिंड लढवीत असताना दमदार फलंदाजी करीत न्यूझीलंडला पराभवापासूनच वाचवले. त्याेने वेलींगटच्यात मदतीने सहवाव्यां विकेटसाठी ३५० धावाची विक्रमी भागिदारी केली. सोमवारी दिवसअखेर न्यूझीलंडच्या सहा बाद ५७१ धावा झाल्या आहेत. उद़या शेवटचा दिवस असून टीम इंडियाला आता हा सामना ड्रा करावा लागणार आहे.

Leave a Comment