दहावी बारावी मुलांसाठीही आता समुपदेशकाची सोय

पुणे, – राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्याे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास. त्यांच्यासाठी बोर्डातर्फे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 20 फे बु्रवारी ते 29 मार्च आणि दहावीची परीक्षा 3 मार्च ते 27 मार्चया दरम्यान होणार आहे.या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या या भीतीच्या मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत बोर्डाने राज्यस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. समुपदेशकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि प्रश्न्पत्रिकेसंबंधित प्रश्नाकची विचारणा करू नये, असे बोर्डाकडून कळविण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठया वेळेतच विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाणार आहे. समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे :
1) 9922453235
2) 9960488618
3) 9422083886
4) 9822713995
5) 9960760114