मुंबई – ज्येष्ठ समाजसेविका आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यंदाची लोकसभा निवडणूक केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पाटकर कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार हे लवकरच जाहीर केले जाणार आहे.

या संबंधात मेधा पाटकर म्हणाल्या की, जनतेकडून वारंवार निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला गेला आहे व त्यामुळेच जनतेच्या मताचा आदर करून मी निवडणूक लढवित आहे. राजकारणात सामील होऊनच त्यात बदल घडविता येतो. अर्थात जनआंदोलनते आम्ही सुरूच ठेवणार आहे मात्र त्याचबरोबर राजकारणातही सक्रीय होणार आहे. पक्ष जेथून निवडणूक लढविण्यास सांगेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सगितले.
नाशिक लोकसभा मतदारसघातून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जलसंपदा खात्याचा भष्टाचार उघडकीस आणणारे पाटबंधारे अभियंता विजय पांढरे आपतर्फे निवडणूक लढविणार आहेत.