अत्याचारांसाठी मुलींचे कपडे जबाबदार: आशा मिर्गे

नागपूर – मुली- महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी मुलींचे कपडे, मुलींचं वागणं, आणि अयोग्य ठिकाणी जाणं या तीन गोष्टी करणीभूत आहे, असं मत महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी व्यक्त केलं आहे. त्या नागपुरात बोलत होत्या. नागपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने युवती शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी हे मत नोंदवलं.

महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी सजग अशी महिला आयोगाची ओळख आहे. मात्र आयोगाच्या सदस्यांच्या या वक्तव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मिर्गे यांना महिला सुरक्षा आणि बलात्कार याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देताना आपलं मत नोंदवलं. यावेळी त्यांनी दिल्ली आणि मुंबईतीली शक्ती मिल गँगरेपचं उदाहरण दिलं. मिरगे यांनी त्यांच्या दाव्याचं स्पष्टीकरण उदाहरणासह दिलं. दिल्लीतल्या निर्भयानं रात्री आपल्या मित्रासोबत चित्रपट पहायला जाण्याची काय गरज होती. असा सवालही त्यांनी विचारला. शिवाय शक्ती मिलमधल्या पीडित मुलीनं तिथं जाण्याची गरजच काय, असा अजब सवालही त्यांनी विचारला.