ऑस्ट्रेलियन ओपनची गतविजेती व्हिक्टोरिया अझारेंका पराभूत

मेलबर्न, – गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालांचे सुरू झालेले सत्र अजून सुरूच आहे. या स्पलर्धेत गतविजेती ठरलेली व्हिक्टोरिया अझारेंका हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. तिच्यापकडे या स्पिर्धेची विजेती म्हणून पाहिले जात होते. तिच्या या पराभवाने सर्वाना धक्का बसला आहे.

उपांत्यपूर्व फेरीत अग्निस्झका रॅडवान्स्का हिने व्हिक्टोरिया अझारेंका हिचा ६-१, ५-७, ६-० पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. आता रॅडवान्स्काचा सामना उपांत्य फेरीत कॅनडाच्या डॉमिनिका चिबुल्कोवा हिच्याशी होणार आहे. त्याामुळ आता आगामी काळात सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

अझारेंकाच्या पराभवामुळे या स्पर्धेतून आतापर्यंत पहिल्या तीन मानांकित खेळाडूंना पराभव स्वीकारावा लागला आहे. यापूर्वीच या स्पतर्धेतून सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांचा चौथ्या फेरीतच पराभव झाला होता. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया ओपनमध्येभ भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा, लिएंडर पेस आणि रोहन बोपन्नाने विजयी मोहीम कायम ठेवली आहे. तिघानेही ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.