राज्यसभेचे उमेदवार निवडीचे शरद पवार यांना सर्वाधिकार

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्या उमेदवारांबरोबरच राज्यसभेचे उमेदवार निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यायत आले आहेत. त्यािमुळे आता लवकरच उमेदवार जाहीर करण्यादत येणार असे दिसत आहे. लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने केलीच नाही. शिवाय राज्यसभेचे उमेदवार कोण असणार, याचाही निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

यांसदर्भात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या वेळी काही लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांशीही पवार यांनी संवाद साधला. लोकसभेच्या उमेदवारांची अंतिम यादी आणि राज्यसभेच्या दुस-या जागेसाठीचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत लोकसभेसाठी अंतिम उमेदवार कोण असावेत याची चर्चा झाली.

शिरूर, बीड, माढा, दिंडोरी, बुलढाणा या मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्याशी पवार यांनी चर्चा केली. काँग्रेसबरोबरचे जागा वाटप अजून निश्चित झाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार नाही, अशी भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांबरोबर चर्चा करून जागावाटप निश्चित केले जाईल. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

Leave a Comment