पाकिस्तानमध्ये 25 दहशतवादी ठार

इस्लामाबाद- उत्तर वझिरिस्तानमध्ये पाकिस्तानच्या लष्कराने हवाई दलाच्या साहाय्याने राबविलेल्या एका मोहिमेत 25 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. हवाई दलाने केलेल्या बॉंबवर्षावात हे दहशतवादी ठार झाले. या भागात तालिबानी कारवाया वाढल्याने त्यांच्या तावडीतून प्रदेश मुक्‍त करण्यासाठी लष्कराने ही मोहीम उघडली आहे. ठार झालेले दहशतवादी बझार आणि चर्चमध्ये झालेल्या बॉंबस्फोटप्रकरणी आणि रविवारी झालेल्या बन्नू हल्ल्यातील सहभागी असल्याचेही लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. लष्कराने केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी जखमी झाले आहेत. लष्कराने हवाई दलाची मदत घेतल्यावरून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.