सलमानप्रकरणी सुनावणी तहकूब

मुंबई – चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणाची १२ फेब्रुवारीपासून सेशन्स कोर्टात नव्याने सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारने या विरोधात हायकोर्टाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी सेशन्स कोर्टात झाली. त्यावेळी पोलिसांच्यावतीने ६४ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली. या प्रकरणातील अन्य काही पुरावे पुढील सुनावणीच्या काळात सादर केली जाईल असे, राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यावर कोर्टाने १२ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली.