
न्यूयॉर्क – जगातील मोठ्या मिडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या टाईम वॉर्नरने त्यांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाच्या विक्रीचा करार केला असून हे मुख्यालय तब्बल १ अब्ज ३० लाख डॉलर्सला विकले गेले आहे. या मु्ख्यालयाच्या खरेदीदाराचे नांव आज जाहीर केले जाणार आहे. खरेदीदार आबुधाबीमधील रिअल इस्टेट ग्रुप आहे आणि या कराराच्या विसारापोटी सिंगापूर वेल्थ फंड तसेचआबुधाबीतील वित्तीय संस्थांनी रक्कम पुरविली असल्याचे समजते. या संस्था खरेदीसाठी खरेदीदाराला ८० टक्के रक्कम देणार आहेत. यूएस कमर्शिअल इस्टेट क्षेत्रातील हे सर्वात मोठे डील मानले जात आहे.
