फर्स्टलेडी मिशेल ओबामा घटस्फोटाच्या विचारात

वॉशिग्टन – अमेरिकेच्या फर्स्टलेडी मिशेल ओबामा त्यांचा ५० वा वाढदिवस शुक्रवारी म्हणजे १७ जानेवारीला साजरा करत असतानाच मिशेल ओबामा यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याची खबर अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मिशेल यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी चर्चा केल्याचेही या माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र ओबामा यांची राष्ट्रपतीपदाची टर्म पूर्ण होईपर्यंत मिशेल यांनी याबाबत चूप बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

या जोडप्यामध्ये बेबनाव होण्यास ओबामा यांनी केलेले फ्लर्टिंग कारणीभूत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या शोकसभेसाठी गेले असताना ओबामा यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान हेल थॉर्निंग यांच्यासोबत काढून घेतलेले फोटो मिशेल यांच्या नाराजीचे कारण बनले आहेत. त्यातून दोघांत बेबनाव झाला आणि तो इतका वाढला की हवाई येथे सुट्टी घालविल्यानंतर मिशेल यांनी ओबामा यांच्यासमवेत व्हाईट हाऊसमध्ये परतण्यास नकारच दिला होता. मात्र देशासाठी असे करू नकोस असे ओबामांनी विनविल्यानंतर त्या परतण्यास तयार झाल्याचेही सांगितले जात आहे.

ओबामा यांची राष्ट्राध्यक्षपदाची मुदत २०१६ मध्ये संपते आहे. मिशेल यांना त्यांच्या निकटवर्तीयांनी ओबामा यांनी यापूर्वीही दोन वेळा त्यांची फसवणूक केली असल्याची खबर दिली असून ही खबर सिक्रेट सव्र्हिसमुळे दाबली गेली होती असेही वृत्त आहे.