लास वेगास- गुगलने खरेदी केलेल्या मोटोरोला कंपनीचा मोटो जी अॅड्राईड फोन भारतात जानेवारीच्या अखेरी दाखल होणार असल्याचे कंपनीचे ग्लोबल मार्केटिंग उपाध्यक्ष स्टीव्ह सिन्क्लेअर यांनी जाहीर केले आहे. भारतात या फोनची किंमत किती असेल हे जाहीर केले गेलेले नाही मात्र अमेरिकेत हा फोन १७९ व १९९ डॉलर्समध्ये विकला जात आहे.
हा फोन भारतात कंपनी भागीदारासह लाँच करणार आहे. ४.५ इंचाचा स्क्रीन, ८,१६ जीबी स्टोरेज, १जीबी रॅम, गुगल अँड्राईड ओएस, ५ मेगापिक्सलचा रिअर व १.३ मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच नव्यानेच आलेली किटकॅट ४.२.२ ऑपरेटिग सिस्टीम या फोनला देण्यात आली आहे. हा फोन स्पर्धात्मक किमतीत भारतात विकला जाईल असे वृत्त आहे. सध्या मोटो जी ब्राझील, मेक्सिको, चिले, अर्जेंटिना, पेरू, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व कॅनडा देशात विकला जात आहे आणि २०१४ सालात तो आणखी ३० देशांत विक्र्रीसाठी उपलब्ध होणार आहे.