राज ठाकरेना आजोबा आठवतील- विजय पांढरे

पंढरपूर: आम आदमी पक्षचा बाप काढणा-या राज ठाकरेंना निवडणुकीनंतर आजोबा आठवतील, अशी तिखट प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते विजय पांढरे यांनी दिली आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते. सेवानिवत्त अधिकारी विजय पांढरेंनी पंढरपूर येथे झालेल्याा आपच्या सभेत राज यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

नुकत्याच झालेल्या नाशिक दौ-यात राज ठाकरे यांनी गुरुवारी ‘आप’ कशाला, महाराष्ट्रात आम्ही आहोत ना बाप, असे म्हणत ‘आप’ची खिल्ली उडवली होती. त्यां च्याज या वम्कंव्याावर चो‍हूबाजानी टीका होत असतानाच आता विजय पांढरेंनी आपच्या सभेतून राज यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनच्याावर हल्ला्बोल चढविला आहे.

पुढे बोलताना पांढरे म्हणाले की, केवळ सभेत भडक वक्तव्य करणे हा हा राज ठाकरेंचा स्वभाव आहे. पण निवडणुका होतील आणि निकाल लागतील तेव्हा, राज ठाकरेंना बाप नाही, तर त्यांचे आजोबा आठवतील. आपण प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गाने गेलो असतो, तर बरे झाले असते, असं राज यांना वाटणार आहे.